बदलत्या वातावरणामुळे घशाला त्रास होऊ शकतो. यामध्ये घसा बसण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. त्यासाठी तुम्ही हे उपाय करु शकता. आल्याला लिंबू आणि मीठ लावून काही वेळासाठी ते तोंडात ठेवा. तसेच दूधात आलं घालून दूध उकळवून प्या. मीठ घातलेलं गरम पाणी प्यायल्याने देखील आराम मिळण्यास मदत होते. गरम पाण्याची वाफ घेतल्याने घश्यासाठी फायदेशीर ठरु शकते. लिंबासोबत काळीमिरी खाल्ल्याने घश्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. आल्याच्या चहा पिल्याने देखील मदत होऊ शकते.