आपल्यापैकी अनेकजण हे चहाप्रेमी आहेत.



अनेक जणांना सकाळी उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते.



जर तुम्हाला रिकाम्या पोटी चहा प्यायची सवय असेल,



तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी वाईट आहे.



चहातील काही घटक हे पचनसंस्थेवर परिणाम करतात.



त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.



रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅसची समस्या उद्भवते.



तसेच चिडचिडेपणा वाढतो.



यकृतावरही वाईट परिणाम होतो.



विशेषत:उन्हाळ्यात रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.