सूर्यनमस्कार वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात. सूर्यनमस्कारांमुळे श्वसन तंत्र मजबूत होते आणि आतड्यांच्या कार्यक्षमता सुधारते. सूर्यनमस्कार बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यावर रामबाण उपाय. शरीराची स्थिती सुधारते आणि शरीरात योग्य संतुलन निर्माण करण्यास मदत होते. आपली पचनक्रिया सुधारते आणि भूक चांगली लागते. सूर्यनमस्कारमुळे तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते. रोज सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक बनवते. मांसपेशीचे कार्य सूर्यनमस्कारमुळे सुरळीत होते व त्यांचा आरोग्याला फायदा होतो. हात-पाय, कंबर, खांदे यांच्या स्नायूंना मजबूत करते. सूर्यनमस्कार तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी महत्वाचे आहे. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.