पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदी लावणे ही फार जुनी पद्धत आहे.
यामुळे केसांचे सौंदर्य वाढते आणि केस मजबूत होतात.
मेहंदीमध्ये अनेक गोष्टी मिसळून दुप्पट फायदे मिळू शकतात.
यापैकी एक म्हणजे मेहंदी पावडर पेस्टमध्ये कॉफी मिसळा. या दोन्ही गोष्टी रंग गडद करू शकतात.
केस पांढरे होण्याची समस्या दूर करण्यासाठी, ब्लॅक टीच्या हेअर रिंसने तुम्ही केस स्वच्छ धुवू शकता.
यासाठी एका भांड्यात दोन चमचे ब्लॅक टी पाण्यात मिक्स करा. त्यात थोडे मीठ घालून पाणी उकळून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर गाळून केसांना लावा.
केवळ रोगांवर उपचार नाही तर केसांची चांगली काळजी घेण्यासाठी देखील कढीपत्ता वापरतात.
केस काळे करण्यासाठी आवळा पावडरमध्ये कढीपत्त्याचा रस मिक्स करा आणि केसांना लावा.
ही पेस्ट केसांवर तासभर राहू द्या, मग केस धुवा.