आंबट - तिखट पाणीपुरीचे पाणी जर तुम्हाला तोंड आले असेल तर गुणकारी आहे.
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाणीपुरी खाणे उपयुक्त ठरते.
पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणारी हिरवी कोथिंबीर पोटफुगी आणि लघवीची समस्या दूर करते.
मळमळ, मूडस्विंग अशावेळी पाणीपुरीची खूप मदत होते.
पाणीपुरीच्या पाण्यामध्ये जिरे, काळे मीठ आणि पुदिन्याचा समावेश असतो, त्यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते.
मधुमेह असणारे लोक सुद्धा पाणीपुरी खाऊ शकतात.
पाणीपुरीच्या पाण्यामध्ये मिरची, लिंबू, हिंग यांचा समावेश असतो, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी वापरले जाणारे मसाले तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणार्या जलजीराच्या पाण्याने तोंडात आलेले अल्सर किंवा फोड बरे होतात.
पाणीपुरीमधील काळे मीठ त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.