प्रत्येकाला आपले लग्न अविस्मरणीय आणि खास बनवायचे असते.

लग्न आयुष्यात एकदाच होते,म्हणूनच लोकांना ते खूप खास बनवायचे असते.लोकांची लग्नाची अनेक स्वप्ने असतात.

अशे काही लग्नांचे ठिकाणे आहेत, जिथे लग्नाचे नियोजन करणे तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव ठरू शकते:

उदयपूर हे इतिहास, नृत्य आणि भव्य राजवाडे असलेले एक प्रमुख वेडिंग डेस्टिनेशन आहे.

बहुतेक लोकांच्या मनात पहिला विचार येतो तो उदयपूर. तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदयपूरला पूर्वेचे व्हेनिस म्हटले जाते.

उदयपूर हे अनेक हॉलिवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटींचे आवडते लग्नाचे ठिकाण आहे.

अशाप्रकारे उदयपूरमध्ये लग्नाचे नियोजन करणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम अनुभव असू शकतो.

बीचवर लग्नाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही गोव्याला जाऊ शकता.

बहुतेक जोडप्यांच्या स्वप्नातील लग्नात गोव्याचे नाव समाविष्ट आहे.

गोव्यातील बीचवर प्री-वेडिंग फोटोशूट करणं हाही एक उत्तम अनुभव ठरू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.