LG ने आपला नवीन LG Ultra Tab लॉन्च केला आहे. LG अल्ट्रा टॅब Android 12 वर काम करतो. LG अल्ट्रा टॅबमध्ये 10.35-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. टॅबला स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 4 GB RAM + 64 GB स्टोरेज मिळते. एलजी अल्ट्रा टॅबमध्ये 8 एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या टॅबमध्ये यूएस आर्मीचे MIL-STD 810G स्टॅंडर्ड रेटिंग आहे.