महालक्ष्मी येथील 'प्रभुकुंज' या मंगेशकर कुटुंबियांच्या निवासस्थानी आकाशकंदील लावल्यावर प्रचंड आनंद आणि मानसिक समाधान मिळायला लागले असे अरविंद भोसलेंनी म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा लतादीदींच्या निवासस्थानी पारंपरिक आकाशकंदील पाठवले. त्यावेळी त्यांना आवडतील की नाही म्हणून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ते दर्शनी भागात लावले नाहीत.
त्यांनी बाजारपेठेतून नेहमीचे आकाशकंदील आणून लावले आणि आम्ही पाठवलेले आकाशकंदील दर्शनी भागात न लावता अन्य ठिकाणी लावले.
काही वेळाने ते पारंपरिक आकाशकंदील लतादीदींच्या नजरेस पडले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारले हे आकाशकंदील कुठून आणले?
असे आणखीन मिळतील का बघा. आपण देवघर आणि घराच्या दर्शनी भागात लावूया. साक्षात लतादीदींकडूनच ही सूचना आल्यावर त्या व्यक्तीची तारांबळ उडाली.
त्यांनी मला संपर्क साधला आणि झालेला प्रकार मला सांगितला. मी त्यांची तळमळ पाहून त्वरित आणखी पारंपरिक आकाशकंदिलांची व्यवस्था केली.
त्यावर्षीपासून दैवी मंगेशकर कुटुंबियांच्या निवासस्थानी आम्ही पारंपरिक पद्धतीने बनवलेले आकाशकंदील घेऊन जातो असा खास अनुभव अनिल भोसले यांनी शेअर केला आहे. आकाशकंदील बनवयाची प्रक्रिया त्यांनी समजून घेतली.