मुंबईमधील प्रभादेवी येथील दैनिक सामनाच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या बेस्टच्या वीज सबस्टेशन केबिनला भीषण आग लागली.



दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.



आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले



या घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.



आज दुपारी अचानकपणे सबस्टेशनला आग लागल्याने खळबळ उडाली



या आगीत दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आणि तीन मोठे स्विच जळून खाक झाले आहेत



तर, या केबिनजवळ असलेल्या 5 दुचाकींना आगीची झळ बसल्याने नुकसान झाले आहे.



सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही



शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी करण्यात येत आहे