आज 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.



राजाच्या विसर्जनाची मिरवणुकीची सुरुवात पारंपारिक कोळी नृत्यानं झाली.



लालबागच्या राजाचा विजय असो अश्या जल्लोषात... लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल झाला.



मुख्य प्रवेशद्वाराजवळ लालबागच्या राजावर पुषवृष्टी झाली.



नवसाला पावणारा बाप्पा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे.



लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मंडळाकडून तयारी काल (बुधवार)पासूनच सुरू करण्यात आली होती.



लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत हजारोंच्या संख्येनं गणेशभक्त सहभागी झालेले झालेले फोटोत पाहू शकतो.



त्याकरता विशेष व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.