भारतात विविध प्रकारचे प्राणी घरात पाळले जातात. ज्यांना आपण पाळीव प्राणी, पाळीव पक्षी म्हणतो. ज्यात कुत्रा, मांजर, गाय, म्हैस अशा प्राण्यांचा समावेश आहे. पण असेही काही प्राणी आणि पक्षी आहेत... ज्यांना आपण घरी पाळलं तर आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो. देशात सारस पक्षाला घरात ठेवण्यावर बंदी आहे. याच प्रमाणे पोपट, मोर, घुबड, बहिरी ससाणा यांसारखे पक्षी आपण पाळू शकत नाही. प्राण्यांमध्ये हत्ती, उंट, हरण, माकड यांना आपण घरी पाळू शकत नाही. याच प्रमाणे मगर, साप, कासवांना आपण घरात ठेऊ शकत नाही. या प्राणी, पक्षांना घरात ठेवल्यास कारवाई होऊ शकते.