हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का असते? 'या' मागचं कारण माहित आहे का?



सर्व हॉटेल्समध्ये फक्त पांढऱ्या बेडशीट वापरल्या जातात हे तुम्ही पाहिलंच असेल.



पण तुम्ही कधी विचार केलाय का, हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची चादर का वापरतात? जाणून घ्या या मागचं कारण.



हॉटेलच्या खोल्यांमध्ये पांढऱ्या चादर अर्थात बेडशीट किंवा उशीचं कव्हर वापरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पांढऱ्या चादरी स्वच्छ करणे खूप सोपं आहे.



हॉटेल्समध्ये एकाच वेळी सर्व खोल्यांमधील चादरी आणि कव्हर ब्लीच वापरून धुतले जातात, तसेच त्या बेडशीट क्लोरीनमध्येही भिजवल्या जातात.



अशा वेळी जर या चादरी रंगीत असतील तर त्यांचा रंग लवकरच फिकट होऊ लागतो
त्यामुळे इतर रंगाच्या चादरी दिसायला रंग उडालेल्या दिसातात.


पण पांढऱ्या रंगाच्या चादरींच्या बाबतीत ही समस्या नसते.



याशिवाय कमी किमतीत जाड चादरी खरेदी करण्यासाठी पांढरा रंग हा उत्तम पर्याय आहे.



पांढरा रंग सामान्यतः लक्झरी लाईफस्टाईलशी संबंधित आहे.
अशा परिस्थितीत हॉटेलच्या खोलीतील पांढऱ्या बेडशीटमुळे रूमला लक्झरी लूक मिळतो.


पांढऱ्या रंगाच्या चादरीवरील डाग ब्लीचच्या मदतीने सहज साफ होतात शिवाय याचा कलरची उडण्याचा प्रश्न येत नाही.