'भगवान देता है तो छप्पर फाड के...' ही म्हण एका हातमजुरीवर पोट भरणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत खरी ठरली आहे. मोलमजुरी करणाऱ्या एका व्यक्तीच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले आणि यावर त्यालाही विश्वास बसणं कठीण झालं. एक दिवस अचानक या मजुराच्या खात्यात 200 कोटी रुपये आले आणि तो चक्क कोट्यधीश बनला. ही घटना हरियाणामध्ये घडली आहे. हरियाणातील मजुराच्या बँक अकाऊंटवर अचानक 200 कोटी रुपये आले. आठवी पास मजुराच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम आल्याचे समजतात, त्याला धक्काच बसला. हरियाणाच्या दादरी जिल्ह्यातील बेरला गावात राहणाऱ्या विक्रम नावाच्या व्यक्तीसोबत ही अविश्वसनीय घटना घडली आहे. ही एवढी मोठी रक्कम म्हणेज तब्बल 200 कोटी रुपये बँक खात्यावर नेमके आले कुठून याची कल्पना या मजुरालाही नव्हती. उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी या मजुराला याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच मजुराने हरियाणा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आणि मदतीची विनंती केली. मोठी फसवणूक झाल्याचं मजूर आणि कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पोलिसांनी मजूर विक्रम आणि त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.