रस्ता शोधण्यासाठी हल्ली गुगल मॅपचा वापर सर्रासपणे केला जातो.



मात्र, गुगल मॅपचा वापर करणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं



मृत फिलीप पॉक्सोनच्या पत्नीने गुगलला थेट कोर्टातच खेचलं आहे.



मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात नॉर्थ कॅरिलोनामध्ये त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.



फिलीप पॉक्सोन हे आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या ठिकाणी जात होते.



पॉक्सोन यांच्या पत्नीने आपल्या मैत्रिणीच्या घरी पार्टी ठेवली आणि तिथे त्यांना बोलावले होते.



वाढदिवसाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी गुगल मॅपचा वापर केला.



मॅपने त्यांना 10 मिनिटाच्या शॉर्ट कटचा रस्ता दाखवला.



मात्र, मॅपने त्यांना एका पुलावर नेले. हा पूल 2013 मध्ये तुटला होता



पॉक्सोन हे रात्री 11 च्या सुमारास गेले. त्या ठिकाणी लाईटही नव्हती.



पॉक्सोन यांची कार पाण्यात कोसळली आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.