सध्या बॉलिवूडमध्ये महिला केंद्रित कथानक असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे.



चित्रपटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. या वुमेन सेंट्रिक चित्रपटांबाबत कृतीनं तिचं मत व्यक्त केलं आहे.



महिला केंद्रित चित्रपट हे नेहमी कमी बजेटमध्ये बनवले जातात, असं एका मुलाखतीमध्ये कृतीनं सांगितलं.



कृती म्हणाली, 'खरे सांगायचे तर, काही वर्षांच्या आधी अनेक महिला केंद्रित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली, मग ती मदर इंडिया असो किंवा चालबाज.



'महिलांसाठी अद्भुत, सशक्त आणि चांगल्या भूमिका लिहिल्या जात होत्या. आता अशा चित्रपटांची संख्या वाढत आहे.' असंही कृतीनं सांगितलं.



पुढे कृती म्हणाली, 'चित्रपटसृष्टीतील लोक अजूनही मोठी रिस्क घेण्यास आणि महिला केंद्रित चित्रपटांवर काम करण्यास संकोच करतात. पण आता महिला प्रमुख भूमिकेत असेल, अशा चित्रपटांची संख्या वाढत आहे.'



कृती अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



आदिपुरुष, गणपत, भेडिया आणि शहजादा हे कृतीचे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.



गेल्या वर्षी कृतीचा मिमी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील कृतीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



मिमी चित्रपटामध्ये कृतीसोबतच सई ताम्हणकर आणि पंकज त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका साकारली.