गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात. गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं. गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचं आणि स्नायूचं आरोग्य सुधारतं. तसेच त्वचेचं आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं. गाजर हे मेंदूच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं. गाजर खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. जुलाब होत असल्यास गाजर वाफवून त्याचा रस थोड्या थोड्या वेळाने प्यावा. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं.