एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे फोटोत दिसत आहे. गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसन ब्लूमध्येमध्ये शिंदे समर्थकांनी फोटोसेशन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही शिवसेना आमदारांची बंडखोरी शमली नाही. आज सकाळी आणखी चार आमदार गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. आशिष जैस्वाल, सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे शिंदे यांच्या गटात सामिल झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व करताना पहिला फोटो समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना संबोधित केलं. यावेळी बाळासाहेबांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या.