क्रिती सेनन बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. फारच कमी वेळात क्रितीने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. सध्या क्रिती तिच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी क्रिती ऑरेंज कलरची साडी आणि स्टायलिश स्ट्रॅप ब्लाऊज अशा लूकमध्ये दिसली. सिंपल न्यूड मेकअप आणि ऑरेज साडी हे कॉम्बिनेशन क्रितीवर फारच उठून दिसत होतं. क्रिती सेनन आणि वरूण धवन यांचा भेडिया चित्रपट 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. क्रिती सेनन हिने अभिनयाची सुरुवात 2014 साली तेलगू चित्रपटातून केली. क्रितीने 2014 साली आलेल्या हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.