अभिनेत्री श्वेता साळवे आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्वेता साळवेचा जन्म 12 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत झाला. श्वेताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. श्वेताला अभिनयासोबत नृत्याचीदेखील आवड आहे. श्वेताने 1998 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेद्वारे मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. श्वेता साळवेने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘लेफ्ट राइट लेफ्ट’या कार्यक्रमामुने श्वेताला लोकप्रियता मिळाली. श्वेता साळवे 2012 साली हरमीत सेठीसोबत लग्नबंधनात अडकली. श्वेता साळवेने ग्लॅमरस स्टाईलने छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींची प्रतिमा बदलली आहे. श्वेताने 1999 साली ‘प्यार में कभी कभी कभी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.