कोकणातील हापूस आंब्याची जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झाली आहे. (Photo Credit : unsplash) दरवर्षी जानेवारी महिन्यांत हापूसच्या फक्त 25 ते 30 येत होत्या. (Photo Credit : unsplash) मात्र यंदा 360 पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्यात.(Photo Credit : unsplash) तसंच प्रत्येक पेट्यांना 7 ते 12 हजारांचा दर या आंब्यांना मिळू लागलाय. (Photo Credit : unsplash) आंबा पिकायला आणि बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याला एप्रिल महिना उजाडतो.(Photo Credit : unsplash) फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते.(Photo Credit : unsplash) लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. (Photo Credit : unsplash) कोकणातील हापूसला पुणे,मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी आहे. (Photo Credit : unsplash) कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूसची निर्यात होत असते,यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे. (Photo Credit : unsplash) फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल,अशी अपेक्षा आहे.(Photo Credit : unsplash)