कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर ग्रामस्थांनी तिला भावपूर्ण निरोप दिला.
Image Source: google
महादेवी हत्तीणीला निरोप देताना नांदणी गावातील लोक भावूक झाले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हत्तीणीच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.
Image Source: google
मिरवणुकीदरम्यान काही तरुणांनी गोंधळ घालून पोलिसांच्या गाडीची काच फोडली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला.
Image Source: google
नांदणी मठात महादेवी हत्तीणीचा मागील 33 वर्षांपासून सांभाळ करण्यात आला होता. हत्तीण मठाच्या एक महत्त्वाच्या भाग बनली होती.
Image Source: google
नांदणी मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचे ठिकाण मानले जाते. मात्र आता कोर्टाच्या आदेशामुळे ग्रामस्थ नाराज झाले आहेत.
Image Source: google
हत्तीणीला वनतारा अभयारण्यात नेण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्तब केल्याने ग्रामस्थांची शेवटची आशाही मावळली.
Image Source: ABP MAJHA
‘पेटा’ने हत्तीणीचा परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी समितीकडून करण्यात आली.
Image Source: ABP MAJHA
चौकशी अहवालात प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे कोर्टाने हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय कायम ठेवला.
Image Source: ABP MAJHA
Reliance Foundation च्या माध्यमातून स्थापलेले Vantara Wildlife Rescue & Rehabilitation Centre हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र आहे.
Image Source: ABP MAJHA
हे केंद्र 3,500 एकर भूभागात पसरले असून 3,300 प्रजातींच्या 10,000 पेक्षा जास्त प्राण्यांचा येथे सांभाळ केला जातो.
Image Source: ABP MAJHA
26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकल्पाची सुरुवात झाली आणि 4 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे औपचारिक उद्घाटन केले.
Image Source: ABP MAJHA
येथे MRI, CT Scan, हायड्रोथेरपी, मसाज अशा अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. तसेच हात्ती, चिंपांझी, काराकल व इतर दुर्मिळ प्रजातींचाही समावेश आहे.
Image Source: ABP MAJHA
33 वर्षांची नाळ अखेर तुटली आहे, मात्र महादेवी हत्तीणी आता एका सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी युक्त स्थळी नव्या जीवनाकडे वाटचाल करत आहे.