अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टॅन्ड काढण्यावरुन वाद... खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून वाद... या ठिकाणी खासगी दुकानदार आणि अतिक्रमण विभागाची चांगलीच खडाजंगी झाली महिलांचा दुकाने काढण्यास कडाडून विरोध त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाला महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले जेसीबी आणून अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून असलेली सर्वच दुकाने हटवली दुकानदारांनी कारवाई करण्यास विरोध केला मात्र,अतिक्रमण विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवत सर्वच दुकाने काढली काही महिलांना अश्रु अनावर सुद्धा झाले.आम्ही जायचे तरी कोठे? गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आमची दुकानं असल्याचा दावा त्यांनी केला.