जालना येथील एका आध्यात्मिक संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा मुकूट अर्पण केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनी दिली.
कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी 47 तोळे सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला.
जालना येथील एका आध्यात्मिक संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी
हा मुकूट अर्पण केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनी दिली.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जालन्यातील एका भक्ताने दीड कोटी रुपयांचे दागिने अंबाबाई चरणी दान म्हणून दिले होते
तर कोलकाता येथील एका भक्ताने 32 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट अर्पण केला होता.
त्यानंतर आता 47 तोळे सोन्याचा दुसरा मुकूट देवस्थानच्या खजिन्यात जमा झाला आहे.
या मुकुटाची किंमत 24 लाख रुपये असून देवस्थान समिती कार्यालयात व्यवस्थापकांकडे हा मुकूट सुपूर्द करण्यात आला.
शनिवारी अलंकार पूजेला देवीला हा मुकूट चढविण्यात आल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली.
करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या खजिन्यात सातत्याने भाविकांकडून सोने आणि चांदीच्या दागिने अर्पण केले जाते .