नवरात्रोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शारदीय नवरात्रोत्सव तीन दिवसांवर अंबाबाई देवीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली. यामुळे दागिन्यांना झळाळी आली आहे. देवीची अनेक प्रकारची आभुषणे आहेत. देवींच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आल्याने त्यांना नवीन झळाळी मिळाली आहे. देवीला घालण्यात येणारे अनेक प्रकारे दागिने आहेत. पूजा मांडताना या दागिन्यांचा वापर केला जातो. देवीला दररोज घातल्या जाणाऱ्या दागिन्यांसह खजिन्यातील खास दागिन्यांची देखील स्वच्छता करण्यात आली या विविध दागिन्यांचा देवीची विविध रुपातील पूजा मांडताना केला जातो. सोने तसेच चांदीची देवीची विविध प्रकारातील आभुषणे या विविध दागिन्यांचा देवीची विविध रुपातील पूजा मांडताना केला जातो. सोने तसेच चांदीची देवीची विविध प्रकारातील आभुषणे देवीच्या पालखीची सुद्धा स्वच्छता करण्यात आली आहे.