नवरात्रोत्सवाच्या तोंडावर कोल्हापुरातील श्री क्षेत्र जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता पुन्हा एकदा खचला आहे. पावसाची रिपरिप तसंच पाण्याचा टाका या भागात पाणी साचत असल्याने दलदल होते आणि हा रस्ता खचतो. खूप खोल आणि रुंद भेगा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोणत्याही क्षणी रस्ता तुटून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नवीन पद्धतीने रस्ता बांधून सुद्धा सलग तीन वर्षे रस्ता खचत आहे. खबरदारी म्हणून रस्ता आधीच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गायमुख तलाव मार्गाने भाविकांना जोतिबा डोंगरावर प्रवेश दिला जात आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर येतात. कोल्हापुरात झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या कडेला दोनशे मीटर लांब भेगा पडल्या आहेत.