टी ट्री ऑईल त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. यामुळे त्वचा आणि केसांना प्रचंड फायदा होतो. टी ट्री ऑईल त्वचेवरील डाग कमी करण्यासही मदत करते. या तेलामुळे लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत होते. टी ट्री ऑईलमध्ये नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते अॅथलीट फूट आणि टोनेल फंगस सारख्या बुरशीजन्य संसर्गावर एक उत्तम उपाय ठरतं. हे तेल बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास देखील मदत करु शकतं, ज्यामुळे ते अँटीफंगल क्रीम आणि औषधांसाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय ठरु शकतं. टी ट्री ऑईल केवळ तुमच्या त्वचेसाठीच नाही तर केसांच्या निरोगी वाढीस देखील मदत करु शकतं. हे डोक्यातील कोंडा आणि ड्राय स्काल्पची समस्या कमी करण्यास देखील मदत करु शकतं, जे केस गळण्यास कारणीभूत ठरतं. जर तुमची त्वचा फारच तेलकट असेल तर टी ट्री ऑईल तुमच्यासाठी गेम चेंजर ठरु शकतं. हे तेल त्वचेतील तेल निर्मिती नियंत्रित करण्यास मदत करतं. टी ट्री ऑयल आपल्या सूथिंग प्रॉपर्टीजसाठी ओळखलं जातं. सूजन आणि जळजळ कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर खाज किंवा जळजळ होत असेल किंवा तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर तुम्ही टी ट्री ऑइल लावून त्वचेची जळजळ कमी करु शकता. टी ट्री ऑईल मुरुमांशी लढण्यास मदत करते. हे तेल छिद्रे बंद करण्यास आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास देखील मदत करते.