पावसाळ्यात दमट वातावरण आणि ओलसरपणामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.



बुरशीजन्य आजार म्हणजे, फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि कशी ते जाणून घ्या.



पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं?

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं?

आरामदायक कपडे वापरा. सैल कपडे घातल्यामुळे हवा शरीरात जाईल आणि शरीर ओलसर राहणार नाही. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहिल आणि बुरशीपासून संरक्षण होईल.



फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तुमचे हात आणि पाय नियमितपणे अँटी फंगल साबणाने धुवा.



विशेषतः पावसात भिजल्यानंतर पायांमध्ये चिखल किंवा घाणेरडं पाणी यामुळे तुम्ही अनेक रोगजन्य विषाणूचा संपर्कात येता, यामुळे बाहेरून आल्यावर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवा.



ओले कपडे अधिक काळ अंगावर ठेवू नका. जास्त वेळ त्वचा ओली राहिल्यास फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.



पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. योग्य आहार घ्या.



जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते, यामुळे तुमचं शरीर फंगल इन्फेक्शन प्रतिरोधक होईल.



त्वचा कोरडी ठेवण्यासाठी आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी तुम्ही अँटीफंगल पावडर वापरू शकता. विशेषतः ज्या भागात जास्त घाम येतो, तेथे अँटीफंगल वापरणे फायदेशीर ठरेल.



टीप : यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.