दिवसाची सुरुवात करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

दह्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन बी 12, बी 2 पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखे अनेक घटक असतात.

त्यामुळे हाडे मजबूत करण्यास देखील मदत होते.

तसेच रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास दही उपयुक्त ठरु शकते.

दह्यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित होण्यास देखील मदत होऊ शकते.

यामध्ये असलेले उच्च प्रथिन घटक तुम्हाला दीर्घ काळासाठी पोट भरून ठेवण्यास मदत करतात.

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात.

प्रोबायोटिक्स फायदेशीर बॅक्टेरिया आहेत जे निरोगी आतड्यांतील मायक्रोबायोमला प्रोत्साहन देतात.

दह्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास देखील मदत होते.

तसेच दह्यामुळे संतुलित राहण्यास देखील मदत होते.