भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचा जन्म 24 मार्च 1991 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालाय. क्रुणाल आणि हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांनी खूप मेहनत घेतली होती. कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात खूप आर्थिक संकटाचा सामना केलाय. क्रुणालनं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवलंय. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा कृणाल पांड्यावर बोली लावली होती. आयपीएलमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या क्रुणाल पांड्याची 2018 साली भारतीय संघात निवड झाली.