बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.
सध्या स्वरा लॉस एंजलिसमध्ये गेली आहे.
लॉस एंजलिसमध्ये फिरत असताना तिच्यासोबत एक घटना घडली आहे.
स्वरानं ट्वीमध्ये या घटनेबद्दल माहिती दिली आहे
स्वरानं ट्वीटमध्ये उबर या कंपनीच्या उबर सपोर्ट या अकाऊंटला टॅग केले आहे.
ट्वीटमध्ये स्वरानं लिहिले, 'हाय उबर, लॉस एंजलिसमध्ये एक कॅब ड्रायव्हर माझं सर्व समान घेऊन त्याच्या कारमधून निघून गेला. मी एका प्री- एडेड स्टॉपवर उभी होते.'
पुढे स्वरानं सांगितलं, ' मला वाटतंय ही गोष्ट रिपोर्ट करण्यासाठी अॅपमध्ये काही फिचर नाहिये. माझं समान हरवलं नाही तर तो चक्क घेऊन पळून गेला. मला माझं सामान परत मिळू शकेल का? '
स्वरानं या ट्वीटमध्ये #touristproblems या हॅश टॅगचा वापर केला आहे.