एम.एस. धोनीनंतर विराट कोहली भारताचा दुसरा सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार आहे.

धोनीनं 2016 मध्ये टी-20 संघाचं नेतृत्वं सोडलं होतं. त्यानंतर टी-20 संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे आलं.

आतापर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 50 आंतरराष्टीय टी20 सामने खेळले आहेत.

यापैकी भारतीय संघानं 30 सामन्यात विजय मिळवला आहे.

भारताला 16 सामन्यात पराभवाचा धक्का बसलाय.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा सक्सेस रेट 64 टक्के इतका राहिला.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार म्हणून भारताकडून विराटच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.

तर जागतिक क्रिकेटमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. 50 सामन्यातील 47 डावांत विराट कोहलीनं 47.57 च्या सरासरीनं 1570 धावा चोपल्या आहेत.

कर्णधारपदी असताना सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचच्या नावावर आहेत.


कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी चांगली आहे.