गॅस सिलिंडरचा घरोघरी वापर केला जातोय. त्यामुळे ही माहिती सर्वांसाठी महत्वाची आहे.

सिलिंडरची एक्स्पायरी डेट ओळखणे अतिशय सोपे आहे.

हे समजल्यावर गॅस सिलिंडर फुटण्याचा वा लीक होण्याच्या टेन्शनपासून तुम्ही मुक्त व्हाल.

सिलिंडरच्या रेग्युलेटरच्याजवळ 3 पट्ट्या असतात.

त्यावर काही नंबर आणि इंग्रजी अक्षरात लिहलं जातं.

एकीवर A, B, C, D लिहिलेले असते. A चा अर्थ आहे जानेवारी ते मार्च आणि B चा अर्थ एप्रिल ते जूनपर्यंत असा असतो.

त्याचप्रमाणे C जुलै ते सप्टेंबर आणि D चा अर्थ ऑक्टोबर ते डिसेंबर असा होतो.

अनेकदा यामध्ये मोठ्या दुर्घटना घडतात. अशावेळी, गॅस सिलिंडर वापरताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

यामुळे सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासणे अतिशय महत्वाचे आहे.

गॅसचा वापर करताना सावधानी बाळगायला हवी जेणेकरून यापासून होणाऱ्या मोठा धोका टळू शकेल.