'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो
'कट्यार...' चित्रपटातून सुबोधने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.
बंध नायलॉनचे हा चित्रपट आणि का रे दुरावा, ढोलकीच्या तालावर सारख्या मालिकातून तो टीव्हीवरही झळकला होता.
मराठीतला अष्टपैलू अभिनेता म्हणून सुबोध भावेची ओळख आहे.
सुबोध भावे सातत्याने अनेक महत्वाच्या गोष्टी शेअर करत असतो.
आपल्या सिनेमाबद्दल, मालिकेबद्दल याशिवाय तो काही उपक्रम करत असेल तर किंवा लहान मुलांसाठी तो स्टोरीज वाचतो त्याच्या लिंक्स अशा अनेक गोष्टी तो शेअर करताना दिसतो.
अत्यंत संवेदनशील अभिनेता आणि माणूस अशी सुबोधची ख्याती आहे.
असा हा आपला लाडका अभिनेता आज ४६ वर्षांचा झालाय .
कट्यार काळजात घुसली हा याच नावाच्या नाटकावर आधारित 2015 चा मराठी भाषेतील महाकाव्य संगीत नाटक चित्रपट आहे.
एक युगपुरुष हा ओम राऊत दिग्दर्शित आणि नीना राऊत एंटरटेनमेंट निर्मित 2015 चा मराठी भाषेतील बायोपिक आहे. हा चित्रपट बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकथेवर आधारित आहे.