मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत तिच्या वाढदिवशी म्हणजेच 18 मे 2021 ला विवाहबंधनात अडकली...

मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत त्यांनी दुबईत लगीन गाठ बांधली...

सोनालीने सोशल मीडियावर पहिल्या दिवाळसणाचे फोटो पोस्ट शेअर केले आहेत.

अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येत आहे.

अप्सरेचा पहिला दिवाळसण...

काही दिवसांपूर्वी सोनाली सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पती कुणाल बेनोडकरसोबत मालदिवला गेली होती

लॉकडाऊनमध्ये अगदी साध्या पद्धतीने दुबईत सोनालीने लग्न केले.

साध्या लुकमध्ये सोनालीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ