सध्या आर्थिक व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर सर्रासपणे केला जात आहे. ऑनलाइन खरेदीसाठी पेमेंट करताना डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांक नोंदवावा लागतो. पण डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ काय, हे तुम्हाला ठाऊक आहे का? डेबिट कार्डवरील असणाऱ्या 16 आकडी क्रमांकामध्ये महत्त्वाची माहिती असते. या 16 आकडी क्रमांकात तुमच्या बँक खात्याचा क्रमांक, कार्ड कोणत्या कंपनीचे आहे, याची माहिती मिळते. 16 क्रमांकामधील पहिले 6 क्रमांक बँक आयडेंटिफिकेशन नंबर (Bank Identification Number) असतो. त्यानंतरचे 10 अंकाला कार्ड होल्डरचा युनिक नंबर (card holder unique number) म्हटले जाते. कार्ड कोणत्या इंडस्ट्रीने जारी केले, हे कार्डवर असणारा पहिल्या क्रमांक सांगतो. याला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफाय (Major Industries Identification) म्हटले जाते. कार्डचे पहिले सहा क्रमांक कोणत्या कंपनीनं कार्ड इश्यू केलेय, याची माहिती देतात. याला issuer Identification number म्हणतात. सातव्या क्रमांकापासून ते 15 व्या क्रमांकाचा संबंध हा बँक खात्याशी आहे. अखेरचा 16 क्रमांकाचा अर्थ हा तुमचं कार्ड कधीपर्यंत व्हॅलिड आहे, हे दर्शवतो.