KL Rahul Ruled Out : केएल राहुलच्या दुखापतीमुळे धक्क्यावर धक्के, IPL आणि WTC मधून बाहेर
टीम इंडियाला आणि लखनौ संघाला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल याची दुखापत गंभीर आहे. त्यामुळे उर्वरित आयपीएलमध्ये राहुल खेळताना दिसणार नाही.
त्याशिवाय इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधूनही राहुल बाहेर पडलाय. केएल राहुल याने इन्स्टाग्राम पोस्ट करत दुखापतीची माहिती दिली आहे.
लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना केएल राहुल याला दुखापत झाली. राहुलची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जातेय. राहुल सध्या आराम करत आहे.
आरसीबीविरोधात राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण एकही धाव घेतली नाही. आता राहुल याने आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमधून माघार घेतली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलला सुरुवात होणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकसमोर उभे असतील.
ऑस्ट्रेलिया आणि भारताने आपल्या टीमची घोषणा केली आहे. काही खेळाडू इंग्लंडमध्ये सराव करत आहेत. तर काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. केएल राहुल दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकणार आहे.
केएल राहुल याने इन्स्टाग्राम पोस्ट करत दुखापतीची माहिती देत म्हटलं आहे, 'पुढच्या महिन्यात टीम इंडियासोबत ओव्हलवर नसेल, त्यामुळे मी निराश आहे.'
केएल राहुलने पुढे म्हटलं आहे की, 'देशासाठी खेळण्यासाठी मी सर्वकाही करेल. ते नेहमीच माझे लक्ष आणि प्राधान्य राहिले आहे.'