आयपीएल 2023 मध्ये 48 व्या सामन्यात गुजरात विरुद्ध राजस्थान रोमांचक लढत पाहायला मिळाली. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या चालू मोसमात सातवा विजय मिळवला.



गुजरातने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने राजस्थानकडून मागील पराभवाचा बदला घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली.



पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजांना गुजरातच्या गोलंदाजांनी पुरतं नमवलं आणि 17.5 षटकात पूर्ण संघ तंबूत परत पाठवला. गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही धडाकेबाज पद्धतीने सामना संपवला. गुजरातने हा सामना 37 चेंडू राखून जिंकला.



राजस्थानविरुद्ध विजयानंतर गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरात संघाने दहापैकी सात सामने जिंकले असून संघाकडे 14 गुण आहेत.



दुसऱ्या क्रमांकावर लखनौ आहे. लखनौ संघाने 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत.



तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघानेही 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत.



चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघ असून संघाने आतापर्यंतच्या 10 सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत.



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुकडे 10 गुण असून संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत.



मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. पंजाब संघ 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.



पंजाब संघ 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. पंजाब संघाने दहापैकी पाच सामने जिंकले आहेत.



आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता संघाकडे 10 गुण आहेत. कोलकाता संघाने दहा पैकी चार सामने जिंकले आहे.



हैदराबाद संघ सहा गुणांसह नवव्या स्थानावर असून संघाने नऊपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत.



गुणतालिकेत सर्वात शेवटी दिल्ली कॅपिटल्स असून संघाकडे सहा गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंतच्या नऊपैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.