Rohit Sharma in IPL : रोहित शर्माचा आयपीएलमध्ये नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकशी बरोबरी



आयपीएलमध्ये रोहित शर्माच्यानावे एक नकोसा विक्रम नोंदवण्यात आला आहेत.



रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं दिनेश कार्तिकच्या सोबत बरोबरी केली आहे.



आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सने (MI) मागील सामन्यात पंजाब किंग्सवर (PBKS) सहा विकेट्सने विजय मिळवला. यानंतर आयपीएल गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सहाव्या आणि पंजाब किंग्स सातव्या स्थानावर आहे.



मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या मोसमात आतापर्यंत दहा सामने खेळले असून त्यापैकी पाच सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत. संघाकडे सध्या दोन गुण आहेत.



मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात उशीरा झाली, पण संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. असं असलं तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये दिसत आहे.



आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आलेली नाही. अनेक वेळा रोहित शुन्यावर बाद झाला आहे. यासोबतच रोहितने आयपीएलमध्ये नकोसा विक्रम केला आहे.



रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे.



रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात 15 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा खातं न उघडता बाद झाला आहे. यासोबतच त्याने नकोशा विक्रमाला गवसणी घातली आहे.



त्यानं दिनेश कार्तिकच्या सोबत बरोबरी केली आहे. कार्तिकही आयपीएलच्या इतिहासात 15 वेळा शून्य धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.



इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात दिनेश कार्तिक, मंदीप शर्मा, सुनील नारायण हे खेळाडू शून्यावर प्रत्येकी 15-15 वेळा बाद झाले आहेत.



यामध्ये आता रोहित शर्माचं नावही जोडलं गेलं आहे. याशिवाय अंबाती रायडूही आयपीएलमध्ये 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.