IPL 2023 : कोलकाताची हैदराबादवर मात, रोमांचक सामन्यात पाच धावांनी विजय



आयपीएल 2023 मधील 37 व्या सामन्यात झालेल्या रोमांचक लढतीत कोलकाता संघाने हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला.



कोलकात्याने दिलेले 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 166 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून कर्णधार एडन मार्करम याने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली.



कोलकात्याने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात सरासरी झाली.



हैदराबादला 29 धावांवर पहिला धक्का बसला. मयंक अग्रवाल 18 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर लगेच अभिषेक शर्मा यानेही विकेट फेकली.



अभिषेक शर्मा याने नऊ धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीलाही इम्पॅक्ट पाडता आला नाही.



राहुल त्रिपाठी याने 9 चेंडूत 20 धावांची खेळी केली. पावरप्लेमध्ये हैदराबाद संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. हॅरी ब्रूक याला तर खातेही उघडता आले नाही.



हैदराबादच्या ब्रूक याने कोलकात्याविरोधात मागील सामन्यात शतकी खेळी केली होती. ब्रूक याला आता भोपळाही फोडता आला नाही. अडचणीत सापडलेल्या हैदराबाद संघाला सावरण्यासाठी कर्णधार एडन मार्करम सरसावला.



एडन मार्करम आणि हेनरिक कालसन यांनी हैदराबादचा डाव सावरला. दोघांनीही सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप धारण केले.



दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत हैदराबादच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण शार्दूल ठाकूर याने ही जोडी फोडत कोलकात्याला सामन्यात आणले.



पण त्यांचा हा प्रयत्न व्यर्थ गेला आणि कोलकाताने अखेरच्या षटकात हा सामना पाच धावांनी जिंकला