लखनौ विरुद्ध बंगळुरु सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला. आयपीएल 2023 मधील 44 वा सामन्यात लखनौ आणि बंगळुरु (LSG vs RCB) या दोन संघात लढत पाहायला मिळाली. या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. सामन्यानंतर झालेल्या गंभीर सोबतच्या वादावर विराट कोहलीनं आता मौन सोडलं आहे. विराट कोहलीनं त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली आहे. कोहलीने रोमन राजा मार्कस ऑरेलियसचा संदेश असलेला फोटो शेअर केला आहे. यामध्ये लिहलं आहे, 'आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही.' लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात बंगळुरुनं 18 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. लखनौचा फलंदाज अमित मिश्रा, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लखनौचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी हा वाद सोडवला. यानंतर कोहली लखनौचा कर्णधार केएल राहुलशी बोलतानाही दिसला. दरम्यान, हे भांडण कोणत्या कारणावरून सुरु झालं यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.