क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी नुकतेच अडकले लग्नबंधनात 23 जानेवारी रोजी खंडाळ्यात पार पडलं लग्न दोघांच्या लग्नाचे, हळदीचे फोटो झाले आहेत आतापर्यंत व्हायरल सोमवारी हे जोडपं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र बाहेर फिरताना दिसलं . केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही डिनर डेटसाठी बाहेर गेले होते. यादरम्यान दोघांनी एकमेकांचा हात पकडला होता, त्यांनी तिथे असणाऱ्या फोटोग्राफर्ससाठी काही पोजही दिल्या. चाहते यावर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचा भाग असेल, असे मानले जात आहे की, केएल राहुल आणि अथिया शेट्टी मुंबईहून नागपूरला एकत्र येतील.