लखनौच्या मैदानात आज एक लो-स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. रोमहर्षक आणि अटीतटीच्या सामन्यातक भारतानं न्यूझीलंडला 6 गडी राखून मात दिली. सामन्यात भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. ज्यात भारतानं एक चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजीत सर्वच गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. फलंदाजीत मात्र अखेपर्यंत सूर्यकुमार यादवनं टिकून राहून नाबाद 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कॅप्टन हार्दिकनं नाबाद 15 धावांची साथ त्याला दिली. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 1 फेब्रुवारीला होणार आहे. अहमदाबादच्या मैदानात हा सामना सायंकाळी 7 वाजताच सुरु होईल.