दिल्लीचा कोलकात्यावरील हा विजय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या केकेआरचा हा दुसराच पराभव दिल्लीने दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीमुळे मिळवला विजय पंतने कर्णधार म्हणून अगदी उत्तम निर्णय घेत गोलंदाजी फिरवल्याने दिल्लीचा विजय सोपा झाला. दिल्लीच्या सर्वच खेळाडूंकडून दमदार खेळीचे प्रदर्शन केकेआरकडून कर्णधार श्रेयसची 51 धावांची एकहाती झुंज व्यर्थ दिल्लीने सुरुवातीपासून कसून गोलंदाजी कायम ठेवली, शिवाय त्यांनी विकेट्स घेणंही कायम ठेवलं. कुलदीपच्या एका षटकातील महत्त्वपूर्ण तीन विकेट्स संघाला खूप फायदेशीर ठरल्या. खलीलने देखील महत्त्वाच्या तीन विकेट्स घेतल्याने संघाला अधिक फायदा दिल्लीला स्कोर 200 पार पोहोचवण्यात यश आल्याने केकेआरवर आधीच प्रेशर आलं होतं.