अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या कुटुंबासोबत मजा मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. शहनाजच्या भावानं म्हणजेच शहबाज गिलनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये शहनाजसोबत मस्ती करताना शहबाज दिसत आहे. शहबाजनं शेअर केलेल्या फोटोमध्ये शेहनाज ब्लूक कलरचा टॉप आणि डोल्डन पँट अशा लूकमध्ये दिसत आहे. शहनाजनं काही दिवसांपूर्वी सुवर्ण मंदिराला भेट दिली. काही दिवसांपूर्वी शहनाजनं शिल्पा शेट्टीच्या शेप ऑफ यू या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. शहाबाज आणि शहनाज यांच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. शहनाजच्या चाहत्यांनी शहाबाजनं शेअर केलेल्या फोटोला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.