गायक केके यांची अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच केके यांचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहने दे' (Dhoop Paani Bahne De) हे नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहते भावूक झाले आहेत. केके यांनी 'शेरदिल द पीलीभात सागा' या सिनेमासाठी शेवटचं गाणं गायलं होतं. 'धूप पानी बहने दे' असे या गाण्याचे नाव आहे. या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. तर शांतनु मोइत्रा यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'धूप पानी बहने दे' हे गाणं ऐकून चाहत्यांनी केकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. केके यांनी हिंदीसोबतच नऊ भाषांमधील गाणी रेकॉर्ड केली आहेत.