रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. या निमित्ताने चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी कवडीवर राज्यभिषेकाची कलाकृती साकारली. देवगडमधील अक्षय मेस्त्रीने राज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना मानवंदना दिली यासाठी त्याने एक महिना सतत सराव केला. आता त्याला कवड्यावर चित्र साकारायला त्याला पाच मिनिटांचा कालावधी लागला. एक सेंटीमीटर हे सूक्ष्म चित्र साकारायला त्याने भिंगाचा वापर केला आहे. या कलाकृतीसाठी त्याने ॲक्रेलिक रंगांचा वापर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या गळ्यात कवडी माळ आहे. त्याच उद्देशाने त्याने कवडीवर चित्र काढले आहे.