मधुमेहाचे रुग्ण पिस्ता सहज खाऊ शकतात.



बदाम, अक्रोड आणि काजू हे देखील मधुमेही रुग्ण खाऊ शकतात.



पिस्ता एक असा ड्राय फ्रूट आहे जो खायला खूप चवदार लागतो.



पिस्तामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके आणि प्रथिने आढळतात.



अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.



रोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते.



पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे अॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.