टोमॅटो हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे.

प्रत्येक भाजी किंवा जेवणाच्या पदार्थात टोमॅटोचा वापर केला जातो.

फ्रीजमध्ये आपण बऱ्याच भाज्या आणि टोमॅटो ठेवतो.

मात्र,अनेकदा फ्रीजमध्येही टोमॅटो खराब होतात.

भाजीत टोमॅटो असल्याशिवाय तिला चव येत नाही.

आपल्या घरात टोमॅटो साठवणीत असतातच.

अशावेळी टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते.

टोमॅटो स्वच्छ धुवून घेताना,त्याच्या मागे असलेला हिरवा भाग काढू नका,तो कापण्याऐवजी तसाच राहू द्या,यामुळे टोमॅटो बराच काळ ताजा राहतो.

टोमॅटो ठेवताना त्याचा देठ म्हणजेच डहाळीचा भाग खालच्या बाजूला आणि टोमॅटोचा लाल भाग वरच्या बाजूला असला पाहिजे.

अशा प्रकारे टोमॅटोची काळजी घेतल्यास टोमॅटो जास्त काळ ताजे राहतील.