मक्याचे कणीस म्हटले की लगेच तोंडाला पाणी सुटते. मका हा अनेक लोकांचा आवडता पदार्थ आहे. लिंबाचा रस आणि मसाल्यांच्या मदतीने मका हा स्वादिष्ट बनवला जातो. लोक मोठ्या चवीने मका खातात. काही लोक तर गरमागरम कणीस खाण्यासाठी पावसाळ्याची वाट बघतात. मक्याच्या दाण्यांमुळे आरोग्याला कोणतीही हानी होत नाही. मक्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात. दात मजबूत होण्यास मदत होते. मक्यात पित्त कमी करण्याचा गुणधर्म असतो. मक्याच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ पोषक असतात.