शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खूप आवडतात. मशरूम केवळ चवीलाच अप्रतिम नाही,तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. भारतातील अनेक भागात मशरूमचे विविध प्रकार आढळतात. मशरूमला ‘अळंबी’ नावाने देखील ओळखले जाते. आजकाल बाजारात मशरूम सहज उपलब्ध होतात. मशरूम चवीला देखील उत्तम लागतात. मशरूमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मशरूम खूप फायदेशीर आहे. मशरूमच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी पोटाच्या समस्या दूर होतात.